आपली इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी साधे-सोपे माध्यम.

 



How can I improve my  English speaking skills?

How can I improve my English speaking at home?

How can I improve my English speaking everyday?

असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे आणि त्यासाठी माझ्याकडे अतिशय उत्तम असे सोलुशन  काय आहे.......? तर Blooming minds spoken English academy आणि त्यासाठीच माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

नमस्कार‌‌

मी मनीषा पाटणे " Blooming minds spoken English acadamy" ची संस्थापिका

कमीत कमी दहा हजार विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय शिकवून त्यांना त्यांचे करिअर घडविण्यात मदत करणे हाच माझा ध्यास आहे
जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर 4 भाषा कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. ऐकणे बोलणे, वाचणे, आणि लिहिणे.

ऐकणे (Listen)

कुठलीही भाषा शिकण्यासाठी ऐकणे हे एक प्रभावी माध्यम आहे तुमचे ऐकण्याचे कौशल्य कसे सुधारू शकता तर सक्रियपणे ऐकुन म्हणजेच केवळ काय बोलले जाते यावरच नव्हे तर ते कसे बोलले जाते याकडेही लक्ष द लक्ष देऊन ऐकले पाहिजे.

बोलणे  (speak)

तुम्ही जे काही ऐकता ते बोलण्याचा सतत प्रयत्न करा सुरुवातीला थोडे जड जाईल परंतु इंग्रजी मध्ये अशी हजारो छोटी छोटी वाक्य आहे की ज्याला आपण व्याकरणा शिवाय सुद्धा असू बोलू शकतो .व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो.



व्हाट्सअप ग्रुप ( WhatsApp group)

मित्रांनो आता सोशल मीडियामुळे इंग्रजी शिकणे तर फारच सोपे झालेले आहे.  आपल्या मित्रांचा एक ग्रुप बनवा व त्यामध्ये हे छोटे छोटे कम्युनिकेशन करायला सुरुवात करा छोट्या छोट्या वाक्यावर  मित्रांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा त्यातून तुमची इंग्रजी भाषा अधिका-अधिक  उत्तम होऊ शकते.

रेकॉर्डिंग (Recording)



स्वतहाचे बोलणे स्वतः आपण रेकॉर्ड करू शकतो व ते सकाळ-संध्याकाळ काम करताना आणि कुठल्याही वेळेस आपण ऐकू शकतो. आपले उच्चारण सुद्धा आपण चेक करू शकतो .

वाचन  (Reading)

मित्रांनो वाचण्यासाठी आपल्याला अगदी पहिली ते चौथी पर्यंतचे इंग्रजी या विषयाची चे पुस्तक मदत कारण त्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनातली रोजचे दैनंदिन वाक्य सापडतात. त्या वाक्यांमधून आपण शिकू शकतो तसेच वाचनाला पर्याय नाही दररोज जर आपण 10 ते 20 वाक्य जरी वाचली तरी  महिन्याला  आपल्याकडे  खूप मोठा संग्रह होऊ शकतो. आणि त्याची  आपण वारंवार जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला ते सहज शक्य होऊ शकतं.


वर नमूद केलेल्या सर्व टिप्स फक्त एका, एखादी कमी केल्या जाऊ शकते परंतु सराव, सराव आणि सराव. तुमच्याकडे शिकण्याची कोणती ही शैली असो तुमची मूळ भाषा कोणतीही असो ,परदेशी भाषा आत्मसात करण्याची आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे शक्य तितक्या वेळा सराव करणे.
तर मित्रांनो इतक्या सहज आणि साध्या पद्धतीने आपण इंग्रजी शिकू शकतो आणि त्यासाठी लागणाऱ्या आणखी काही टिप्स मी तुम्हाला माझ्या पुढील ब्लॉग मधून देणारच आहे परंतु आता जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मी आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे .
आपले सर्व स्वराज्यसारथी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढवतील हीच अपेक्षा व विनंती.🙏🙏🙏

Comments

Post a Comment